शंभर टक्क्यांचा अट्टाहास कशाला?

ते करुन काय फायदा आहे, शेवटी हे तर रहाणारच ना?

या एका किंवा अश्याच प्रकारच्या प्रश्नांमुळे न जाणे  किती गोष्टी सुरु होण्या अगोदरच संपतात.

एखादी गोष्ट करायची म्हटलं की, ती का करु नये ह्यासाठी अडथळे शोधुन, ती का करणे अगदी शक्यच नाही किंवा ती केल्यानं काहीच उपयोग कसा नाही, हे हूशारीने सांगाणारया लोकांची एक विशिष्ट प्रजाती असते.

यांचा वास्तविक अनुभवाशि वैगेरे काहीच संबंध नसतो, पण कुठल्याही गोष्टीत अडथळा आणण्यात त्यांना महारथ हासिल असते.

उदाहरणच दयायचे झाले तर एकदा मी म्हटलं कि , “मी मांस मच्छी खाण्याच कमी करणार आहे. शाकाहारी जेवण चांगले असते म्हणे आरोग्यासाठी.”

लगेच एका अत्यंत हुशार माणसाने टिप्पणी केली, “अहो काय फायदा नाही हो राव. पुर्ण सोडू शकलात तर काही अर्थ आहे हो, ते काय होतच नाही हो, मी किती प्रयत्न केलाय काय सांगु! आणि काही झाल तरी मग आपण दूध पितोच किंवा चहा तरी, एका अर्थी ते पण शाकाहारीच नाही ना ? म्हणून जे आवडते ते खावे, जास्त विचार नाही करायचा.”

आता ह्यांचा आत्मविश्वास इतका प्रचंड असतो की हे हमखास समोरच्याला काही वेळ तरी मागे खेचतात. 

तसाच एक विचार म्हणजे ” एकट्याने करुन काय होतेय , बाकीच्यांनी सुद्धा केल तर काही फायदा आहे हो.” म्हणजे स्वतः काहिच न करता सतत रडत बसणे हा ह्याचा आवडता छंद असावा.

हाच मुद्धा आहे माझा, एखादी गोष्ट शंभर टक्के जर होणार नसेल तर आपण ती अजिबातच करत नाही. एखादा सांगतो की रोज 40 मिनीटे चाला मग वजन कमी होइल, आपण तेवढा वेळ नसल्याने 10 मिनीटे देखिले चालत नाही आणि आपली सुरुवातच होत नाही.

मागे एकदा मी जेव्हा permaculture design (म्हणजे कायमस्वरुपी शेती ) चा कोर्स करुन आल्यावर प्लास्टिक चा कचरा न करण्यासाठी काही गोष्टी सुरु केल्या होत्या.

त्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगुन टाकतो जी permaculture design च्या वेळी शिकलो होतो ,कि आपण म्हणजे माणसे ही संपुर्ण पृथ्वीवर एकटेच असे प्राणी आहोत जे प्लास्टिक किंवा अगदी कुठलाही कचरा निर्माण करतो. कचरा या वस्तूशी आपल्या इतके जवळचे संबंध कुणाचेच नाहीत हो. बाकी कुठल्याही प्राण्याला कचरा वैगेरे काही माहित नसतो. माणुस सोडून प्रत्येक प्राणी हा एका Regenerative system म्हणजे पुनर्जन्म् प्रणाली चा भाग आहे. प्राण्यांचे मलमुत्र देखील काहीना काही उपयोगी येते निसर्गाच्या, म्हणून पुढच्या वेळी जरा कचरा करताना हा विचार येऊ दया मनात आणि ह्यातून हे सुध्दा कळते कि आपण एकट्याने जशी पुर्ण पृथ्वीची वाट लावायला घेतली आहे तशी बरीच कामे एकट्याने केली तरी बरेच मोठे परिणाम साध्य करता येतात .

असो, तर झाल असं की लगेच अश्याच एका महारथ्याने पुन्हा टिप्पणी केली.

मी एक छोटीशी सुरवात म्हणुन शैम्पू ऐवजी शिकेकाई आणि साबणाऐवजी चण्याच पिठ आंघोळी साठी वापरायला सूरुवात केली. जेणे करुन निदान थोडा प्लास्टिकचा कचरा कमी होऊन प्रदुषण कमी करण्यात माझा थोडा तरी हातभार लागेल.

लगेच मला असे सुचवण्यात आले कि ” गाडीने प्रवास करण्यापेक्षा चालत का नाहीस तु? त्यानेही प्रदुषण होते.” मग शैम्पू आणि साबण सोडून मी वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीतील प्लास्टिक मला दाखवण्यात आले.

आपण शंभर टक्के होत नाही म्हणून अजिबातच प्रयत्न सोडून देतो. पण हे लक्षात घेत नाही कि प्रत्येकाने दहा टक्के जरी हातभार लावला तरी दहा जणात मिळुन एक मोठे काम होऊ शकते, सोबतीला आपली लोकसंख्या आहेच.

हल्ली जोरात चर्चा सुरु आहे कि, चायना च्या मालाचा बहिष्कार करा. फेसबुक वर बरेच ग्रुप निर्माण झालेत आणि त्यातला एक ग्रुप “boycott china product” चे तर 1 महिन्यात 1 लाख फॉलोअरस् म्हणजे चाहते निर्माण झालेत!

आता बहिष्कार केला पाहिजे की नाही लवकरच समोर येइल कदाचित, पण ह्या संकटामध्ये आर्थिक महामंदीजी उभी रहातेय त्यातून बाहेर येण्यासाठी चायनाच काय कूठल्याही देशाची वस्तू विकत न घेता शक्य असेल तेवढ़ी खरेदी भारतीय मालाचीच केली पाहिजे, जेणेकरून आपला पैसा भारतातच राहिल आणि आपल्याच अर्थव्यवस्थेला लाभ होईल.

हे अगदी सोपे समीकरण असले तरी वर नमुद केलेली ती महारथ्यांची प्रजाती आज पुन्हा एक प्रश्न विचारत आहे, की “तुमचा मोबाइल चायनाच आहे, तो का नाही फेकून देत आधी? “

मला फक्त एवढंच म्हणायचेय की कुठलही काम शंभर टक्के करु शकत नाही म्हणुन किंवा आपण एकटेच आहोत म्हणून सोडू नका, उलट जे तुमच्याने होइल ते करुन हातभार लावा.

गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरुद्ध सुरु केलेली स्वदेशी चळवळ सुद्धा एक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केलेली रणनीतीच होती, जेणेकरून आपला पैसा भारतातच राहिल नाही बाहेर जाणार नाही.

ब्रिटिशांच्या राज्यात तर जनतेला तर निवड करण्याची संधीही ही फारशी नव्हती आणि त्यांची लढाई तर फारच कठिण होती. आपल्याला तर संधी नाही फक्त ईच्छेची गरज आहे.

म्हणुन आहे ते टाकून माजू नका, पण भविष्यात खरेदी करताना स्वदेशी वस्तूंची करा.

फक्त एवढंच लक्षात घेऊ की आयुष्यात कुठेही आणि कधीही शंभर टक्क्यांचा अट्टाहास नकोय तर चांगल्या कामासाठी फक्त एक छोटासा प्रयत्न हवाय, सुरवात केलीत तरच अंतर पार होईलच.

~ Cozebuzz

Leave a Reply

Your email address will not be published.