लढा.

हल्ली रोजच, आपण या साथीच्या रोगाविषयी काहीना काही वाचत आहोत.

कोरोनाचा परिणाम काही चांगला व काही वाईट अश्या दोन्ही प्रकारात झाला आहे. निसर्ग तर छान सावरत आहे, पण आपल्यापैकी बहुतेकांसाठी ही जीवघेणी परिस्थिती आहे.

अलीकडेच, माझ्या जुन्या वरीष्टांशी याच विषयावर गप्पा मारत होतो. या कठीण काळाला कस सामोर जावं त्यावर विचार विनीमय करुन झाल्यावर त्यांनी मला “भगवद् गीतेचा सार ” पाठवला.

कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये जेव्हा अर्जुनाने कृष्णाकडे मार्गदर्शन मागितले, तेव्हा भगवान कृष्णांनी काही तत्वज्ञानाच्या संकल्पना सांगितल्या होत्या. ज्या आजही आध्यात्मिक मार्गदर्शन शोधण्यास निघालेल्यांसाठी उपयुक्त आहेत.

मला वाटतं आजही, जीवनातल्या प्रत्येक लढाईला सामोर जाताना श्रीकृष्णा कुठल्यातरी मार्गे असाच सामोरा येत असावा.

अस म्हटल जातं की या संकल्पना कोणत्याही लढाईत आपले मार्गदर्शन करू शकतात आणि या संकल्पनाच सर्व अडचणींची उत्तरे आहेत. महात्मा गांधी सुद्धा या पुस्तकाला आध्यात्मिक शब्दकोश मानत असत.

मी जितक्या वेळा हे वाचतोय, तितक्या वेळा मला असे वाटतेय की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात हे आपल्या सर्वांसाठीच योग्य मार्गदर्शन ठरू शकेल.

माझा आग्रह आहे, की तुम्ही सर्वांनी या काही ओळी फक्त दोन व्यक्तींमधील संभाषणाप्रमाणेच वाचाव्यात. या अगदी सोप्या शिकवणी आहेत, ज्या धार्मिक दृष्टीकोनातून पाहिल्याच पाहिजेत अस नाही, आजही या शिकवणी कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी आपले मार्गदर्शन करू शकतात.

“जे काही झाले ते चांगल्यासाठी झाले”

“जे काही घडत आहे ते चांगल्यासाठी घडते आहे” “जे काही होईल तेही चांगल्यासाठीच होईल”

“तू कशासाठी रडत आहेस? ” तु काय आणले होतेस जे हरवू शकतोस ?”

“तु काय निर्माण केले आहेस, जे नष्ट होईल ?

“तु रिकाम्या हाताने आला होतास आणि रिकाम्या हातानेच जाशील.”

“आज जे काही तुझे आहे ते काल कोणातरी दुसरयाचे होते आणि उद्या ते कुणा दुसरयाचे असेल !”

खरचं किती सुंदर आणि सरळ आहेत या ओळी, बघा तर आपल्या जीवनात, काहीच कायमस्वरुपी नाही.

पृथ्वीही कधीही स्थिर नसते, ती सतत फिरत असते. जणू ओरडून सांगते “या विश्वात एकमेव कधीच न बदलणारी वस्तु म्हणजे फक्त बदल हीच आहे”

“उन्हाळ्याच्या नंतर येणारा पावसाळा, रात्रीनंतर हमखास येणारा दिवस हे सगळेच सांगत आहेत, बदल हा प्रकृतीचा नियमच आहे.”

म्हणूनच, म्हटलयं की आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगणे अपरिपक्वतेचे लक्षण आहे, कारण संपत्ती ही एका मिनिटात नष्ट होऊ शकते.

एका क्षणात लक्षाधीशाचा भिकारी होऊ शकतो, तर क्षणात भिकारयाला लक्ष्मी पाऊ शकते. जो आयुष्यात बदल स्वीकारु शकतो, तोच कूठल्याही लढ्यात विजयी होऊ शकतो! अगदी, कोरोनाच्या ही!

या ओळीं लक्षात ठेवल्यात, तर कदाचित जीवनातल्या सर्वच कठीण परिस्थितींचा सामना करणे अगदी सोप्पे होउन जाईल.

~ Cozebuzz

One Comment Add yours

  1. Rakhee says:

    Nice lines….
    Badal swikarta aal pahije … Mag sagalch sop hoil… Pn tech kathin jatay aajkal..

Leave a Reply

Your email address will not be published.