मी मलाच सांगितलेली ” एक गोष्ट”

काल, एका वर्गमित्राशी बोलत होतो. खरं तर, बरीच वर्षे आम्ही संपर्कात नव्हतो. या लॉकडाउनमध्ये काही गोष्टी तरी छान होत आहेत यात शंकाच नाही.

त्याने माझ्या आडनावाने मला हाक मारत संभाषण सुरू केले, शाळेत असताना फारच कमी जण मला माझ्या नावाने बोलवायचे. त्यामूळे त्याच्यासाठी ते नविन नव्हतं,पण माझ्यापूढ़े माझच आडनाव आज नव्याने पुन्हा समोर येत होत.

अचानक त्या क्षणी, फक्त एक शब्द जे माझंच आडनाव होत त्याने सर्वच काही बदलून टाकले. त्या संभाषणाने चटकन मला परत शाळेत नेले. आम्ही दोघे एकमेकांना शाळेत केलेल्या मस्तीची आठवण करुन देत होतो. शाळेबाहेरच्या जगाशी मैलो दुर असताना बघितलेल्या त्या स्वप्नांबद्दल आम्ही निवांत गप्पा मारत होतो, काही काळ आमचा वास्तविक जीवनाशी काही संबंध उरला नव्हता. ती स्वप्ने आमच्या आजच्या उद्दीष्टांपेक्षा खूपच मोठी होती. आम्हाला जग बदलायच होत, पण कदाचित आमचा ‘आज’ आम्हाला ती स्वप्नेसुद्धा पाहण्याची परवानगी देत नव्हता.

त्या संभाषणात मी एक वेगळाच ‘मी’ होतो, फक्त काही शब्द आणि स्वतःच्याच आयुष्यातील काही जुन्या आठवणी मला स्वत: कडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला लावत होत्या.

माझं हृदय त्या आठवणींचा आनंद घेत होत, ती एक वेगळीच जाणिव होती आणि माझा मेंदू मला स्वत: चा एक वेगळाच चेहरा दाखवत होता, जो मी कित्येक वर्ष पहिलाच नव्हता.

आपल्या सभोवतालच्या गोष्टिंना चित्ररुपात पाहण्याच्या म्हणजेच दृष्टीकोन नावाच्या कलेच्या सहारे आपण हे आयुष्य जगत असतो आणि विशेष म्हणजे आपल्या प्रत्येकाचा दृष्टीकोन हा नक्कीच वेगळा असतो.

आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात किंवा अगदी समान टप्प्यात पण भिन्न परिस्थितींमध्ये आपल्याला भेटलेल्या लोकांचे आपल्या बद्दलचे मत अगदी वेगवेगळे असते. काहींसाठी आपण भरपूर गप्पा मारणारे असतो तर काहींसाठी आपण स्वत: च्याच धुंदीत जगणारे अंतर्मुखी असतो.

केवळ इतरांचाच नाही तर आपलाही स्वत:ला बघण्याचा दृष्टीकोन वेळोवेळी बदलत असतोच.

अचानकच माझा आत्मविश्वास आकाशाएवढा वाढला, कदाचित माझा आजवरचा तो सगळयात चांगला चेहरा असावा. मी स्वत: कडे जगाच्या नजरेतून पाहू लागण्याच्या पुर्वीचा चेहरा होता तो.

मला पुन्हा एकदा, परीक्षेचा सगळा ताण विसरुन जोरात घरी पळायचं होतं, आईला आज शाळेत केलेले सर्व काही सांगायचे होते आणि माझे नविन कुतूहल म्हणजे मी मोठा झाल्यावर काय होणार त्या विषयी आई बरोबर गप्पा मारायच्या होत्या. प्रत्येक आठवड्यात एकदातरी या विषयावर आमच्या गप्पा रंगायच्या. मग, पुढ़े मी ‘ मोठा’ झाल्यावर हा विषय कधी निघालाच नव्हता.

तेवढ्यात माझ्या मित्राच्या सेलफोनची बॅटरी संपली आणि कॉल डिस्कनेक्ट झाला. मला लक्षात आले,की मी घरातच आहे. लॉकडाउने सर्वांना घरातच बंद केले होते आणि नविन जुनी सगळीच स्वप्ने तथाकथित वास्तविकतेच्या खोलीत बंद झाली होती.

“सर्वात कठीण वास्तव, हे वास्तविकता स्वीकारण्यात आहे! ~ जोकर”

माझ्या कुतूहलबद्दल मी आता फार काही करू शकत नाही हे समजताच मी फेसबुक उघडले.

फेसबुक म्हणजे वेगवेगळया प्रकारच्या मित्रांची एक बँकच आहे, त्यापैकी प्रत्येकजण आपल्याला आपण केलेल्या डिपोझीट म्हणजे पोस्टद्वारे बघत असतो. माझ्याबद्दल त्यांची मते मी माझ्या आयुष्यातलं त्यांना जे दाखवतो त्यापुरतीच मर्यादित असतात. अर्थात माझीही अशी बरीच मते आहेतच की, आपण सर्वच कनेक्टेट आहोत पण वास्तवापासुन थोडे डिस्कनेक्टेट असण्याची शक्यता काही नाकारता येत नाही.

“लोक जे काय पाहू इच्छितात तेच पाहतात आणि लोकांना जे काही पहायचे आहे त्याचं सत्याशी काहीही कधीच घेणे- देणे नसते ~ रॉबर्टो बोलनो.”

आजकाल सोशल मीडिया हे लॉकडाऊन आणि त्याच्या परिणामांच्या बातम्यांनी भरलेले आहे.

मी माझ्या भिंतीवर (Facebook wall)स्क्रोल करीत असताना, वेगवेगळया पोस्ट्स पाहत होतो.

कुणी एका विशिष्ट जमातीवर भारतात कोरोना पसरवण्याचा आरोप करीत होत,तर कुणी कुणाच्या एकी दाखवण्यासाठी किंवा फक्त सगळ्यांना तुम्ही एकटे नाही हे सांगण्यासाठी केलेल्या साध्यासुद्या गोष्टिंची खिल्ली उडवत होते.

काही प्रत्येकवेळी ठेच लागताच चीन ची आठवण काढत होते तर काही पंतप्रधानांना या परिस्तितीत कसे वागावे याचे धडे शिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होत.

एकच परिस्थिती आणि माहिती मिळण्याचे मार्गही तेच होते, कारण आज माहिती ही प्रत्येकासाठी समान प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु आपलयाला आपल्या अनुभवानुसार त्या माहितीत काय दिसते त्यावर आपला दृष्टीकोन अवलंबून असतो. वास्तविक जीवनातील आपला एखादा अगदी जवळचा मित्र त्या एका पोस्ट मुळे आपल्याला थेट पाकिस्तानातून आल्यासारखा वाटू लागतो आणि मग रागात किंवा अगदी द्वेषात आपण त्यावर एक भांडखोर अशी कमेंट लिहीतो, सांगुन टाकतो की भाऊ तुमचा जन्मच चुकीचा आहे !

बरं, आपण खरोखरच काही बदलू शकतो असं नाही, परंतु जर आपल्याला हे समजले की आपल्यातील फरक किंवा वाद हा फक्त आपला दृष्टिकोन आहे, तर आपल्याला कदाचित पुन्हा तीच मैत्री प्रेमळ वाटू लागेल.

आपल्यात काही तरी अस असतेच जे आपल्याला त्या व्यक्तीचा मित्र बनवते. कदाचित, जर एकामेकांचा दृष्टीकोन समझला तर ती मैत्री पुन्हा पुर्वीसारखी आपल्याला जोडून ठेवेल.

आणि मग कदाचित आपल्याला हे जग आहे तस दिसेल आणि आपला जगण्याचा दृष्टीकोन ही योग्य दिशेने वाटचाल करेल.

खरं सांगायच तर, आपण सर्वच आपापल्या कथेतील नायक असतो आणि दुसर्‍याच्या कथेतील नायकाबरोबर आपोआपच लढत असतो. एकाच्या कथेतील नायक हा दुसर्‍या कथेत खलनायक असतो.

हेच बघा ना, आपण भारतीय, रामाला एक नायक मानतो आणि त्याची उपासना करतो. राम ह्या देवाच्या अवताराला आपण मर्यादापुरुषोत्तम असे संबोधितो आणि त्याने रावणाला मारलं तो दिवस सण म्हणून साजरा करतो , पण श्रीलंकेत सांगितल्या जाणार्‍या एका कथेनुसार त्यांच्याकडे रावणाला नायक मानले जाते!

~ Cozebuzz

0 Comments Add yours

  1. Kirti says:

    Khup Chan 👌 lockdown mule malahi maz balpan athwal

Leave a Reply

Your email address will not be published.