कुत्रा, जेव्हा घरी येतो.

“कुत्र्यांबरोबरचा माझा प्रवास त्यांच्याविषयीच्या द्वेषामुळेच सुरू झाला. विशेषत: रस्त्यावरचे – आमचे स्वतःचे भारतीय पठ्ठे” .पण लहानपणी मला कुत्र्यांविषयी भरपूर प्रेम होते. आम्ही मित्र परिसरातील कुत्र्यांसह खेळायचो. त्यांच्यासाठी विटांची घरे बांधायचो, दूध आणि बिस्किटे घरातून चोरी करुन न्यायचो. मी तर माझ्या पलंगाखाली एक पिल्लू देखील लपवून ठेवलं होत. कुणालाच न कळता, आयुष्यभर माझ्याकडेच राहिल या आशेने.
खरं तर, पिल्ले फारच मोहक असतात.

पण लवकरच ती वाढतात आणि दुचाकीच्या मागे धावू लागतात. दुर्दैवाने त्यामूळे आणि कुत्रा चावल्यावर लागण्यारया लसींमुळे माझ्या मनात भलतीच भिती निर्माण झाली आणि तेव्हापासून मी कुत्र्यांपासून दूर राहायला लागलो.कित्येक वर्षांपासून, रात्रीच्या वेळी माझ्या इमारतीत प्रवेश करताना मला तिरस्कार वाटायचा कारण आजूबाजूचे कुत्री हल्लाच करायची. खरं तर माझा राग हा फक्त माझी भीती लपवण्याचा प्रयत्न असावा.

पण तो ईतका पराकोटीला गेला की माझ्या परिसरातील सर्व कुत्री पालिकेने घेऊन जावीत अशी माझी इच्छा होती! आणि त्या व्यक्तीचा नेहमीच द्वेष करायचो, जो सर्व कुत्र्याना पालिकेपासून वाचविण्याकरिता आपल्या घरात लपवून ठेवायचा!

माझी कुत्र्यांबद्दल द्वेषाची भावना, त्या दिवसापर्यंत तीव्र होती जेव्हा मला माझ्या भीतीचा सामना करणे भाग पडले. कारण एका मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्ताने मी तिच्या घरी गेलो असताना. तिच्या कुटुंबात एक नवीन सदस्या आली होती. जिचे नाव होते जिंजर !

जिंजर


जिंजर पासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी पहिला दिवस खरोखरच कठीण होता हे सांगण्याची गरज नाही. पण ते फक्त 2 महिन्यांच लहान पिल्लू होत त्यामूळे जास्त काळ माझ्यापासून दूर राहणार नव्हतं. माझ्याजवळ फक्त एकच पर्याय होता तो म्हणजे माझ्या भीतीचा सामना करुन जिंजरशी मैत्री . पुढील 2 दिवस आम्ही तिचा आवडता खेळ खेळत होतो, “टग ऑफ वॉर”. मला सुद्धा अपेक्षे पेक्षा भरपूर मजा आली.
इतिहास घडला, तिने मला लवकरच रेषे पलिकडे ओढले आणि मला पुन्हा कुत्र्यांच्या प्रेमात पाडले.
3 दिवसातच तिने कुत्र्यांचा तिरस्कार करणारया व्यक्तीचे मित्रात रूपांतर केले. मी सुध्दा कुत्रा घरी आणायचं ठरवलं!
पण, मी त्यावेळी एकटाच राहिलो होतो तेव्हा माझ्या सर्वच मित्रांनी ही जबाबदारी न घेण्याचा सल्ला दिला. कारण कुत्री ही लहान बाळांसारखी असतात आणि त्यांना खूप काळजी आणि लक्ष देणे आवश्यक असते. हे जवळजवळ 6 महिने चालू होते आणि मी कुत्रा घरी आणण्याचे मार्ग शोधत होतो.
पण नंतर, काही कारणास्तव मला माझ्या कुटूंबासह रहायला जावे लागले आणि मी पुन्हा कुत्रा असण्याचा विचार करू लागलो. जिंजर एक बीगल जातीची कुत्री असली तरी मी लॅब्राडोर घेण्याचे ठरविले.लवकरच, एका मैत्रिणिने मला योडा (प्राणी संरक्षण संस्था) च्या फेसबुक पोस्टवर लॅब्राडोरसारखे दिसत असलेल्या मिक्स जातीच्या कुत्र्याच्या पिल्लांविषयी टॅग केले. मला लॅब्राडोर जातीचा कुत्रा हवा होता पण योडाने पहिल्या संभाषणातच स्पष्ट केले की हा एक भारतीय कुत्रा आहे आणि जर मला लॅब्राडोरच हवा असेल तर हे माझ्यासाठी न्हवत.
असं असलं तरी चार्ली निःसंशयपणे गोंडसच होता म्हणून मी निर्णय घेण्यापूर्वी एकदा त्या फोस्टरला भेट देण्याचे ठरविले आहे.
फोस्टरकडे चार्लीला हातात घेतलेला क्षण मी अजूनही विसरू शकत नाही. असं वाटत होतं की मी माझ्या बाळाला पहिल्यांदाच धरत आहे. मी स्वत:ला थांबवू शकलो नाही. त्या दिवशी मला समजले की सर्व कुत्री सुंदर आहेत आणि प्रेमासाठी पात्र आहेत.


ईग्रजी डॉग आणि गॉड हे शब्द तयार करण्यासाठी सारखीच अक्षरे का वापरली गेली असावी याच काहीतरी कारण असणारच.
माझ्यासारखे लोक त्यांच्या भुंकण्याला घाबरतात पण आम्ही विसरतो की हा फक्त त्यांचाआवाज आहे – जोरात आणि स्पष्ट! ही त्यांची भाषा आहे, त्याला राग समजू नका.
शब्दही न वापरता हसवणारया या मित्राचे नाव, आम्ही आणखी काय ठेवणार, म्हणुन आम्ही त्याचे नाव चार्ली ठेवले !!
चार्ली चॅप्लिन सारखाच आमच्या जीवनात आला आमच्या स्वतःच्या चार्ली! तो घरी आला तेव्हा तो अवघ्या 28 दिवसांचा होता. एका दुर्दैवी अपघातामुळे त्याची आई त्याची काळजी घेऊ शकत नव्हती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

माझ्या आईची घरी कुत्रा आणण्यासाठी परवानगी नसल्यामुळे चार्लीला घरी आणणे एक कठीण काम होते. परंतु शेवटी माझ्या भावाचे आणि प्राण्यांशी असलेले माझे प्रेम लक्षात घेवून आईने होकार दिला.
माझ्या मते प्राणी चटकन कुटुंबाचा भाग बनतात. दहा दिवसानंतर माझी आई प्रवास करीत होती आणि मला चार्लीच्या आरोग्याबद्दल फोनवरुन विचारणा करतांना एखाद्या खास सदस्याविषयी विचारपूस केल्यासारखी तिने चौकशी केली.
अशा या लहान गोंडस बाहूल्याचे प्रेम आपल जीवनच बदलू शकते आणि केवळ 10 दिवसातच आपल्याला प्रेमात पाडते.
शेवटी मी ह्या पोस्ट द्वारे आपल्या सर्वांना एकच विनंती करतो, कृपया जातींमध्ये भेद करू नका. सर्व कुत्री सुंदर आहेत, कृपया एक दत्तक घ्या, आणि त्यांची बाजार विक्री थांबवा.

चार्ली
जिंजर

~Cozebuzz

Leave a Reply

Your email address will not be published.