करुणा आणि कोरोना

काही जण म्हणत आहेत की कोरोना किमान 2 वर्षे तरी राहिल, माझ्या मते हा फक्त एक समज आहे.
कोरोना सहजासहजी निघुन जाणारा नाही, गेला तरी करुणाबाईंचे चे आयुष्य कायमचे बदलू जाईल हे नक्की.

मुंबईत उद्याची स्वप्ने पाहत जगू पाहणारयांपैकी करुणा एक सामान्य स्त्री आहे.
तीच ऐकलत तर, कोरोना येण्यापूर्वी ती एक सामान्य जीवन जगत होती, म्हणजे समाजात काय चांगल काय वाईट घडतेय हे पाहण्यास तिला जराही वेळ किंवा रस नव्हता.

आई असून सुद्धा आपल्या मुलांबरोबर घालवण्यापूर्ती पण तिच्याकडे पुरेसा वेळ नव्हता, पण ती आणि तिचा नवरा स्वप्नात मात्र भरपूर आनंदी होते. एक स्वप्न, ज्यात त्यांचे स्वतःचे घर होते आणि म्हातारपणी नवराबायको कडे एकमेकांसाठी निवांत वेळ आणि एक आरामशीर जीवन होते. तोपर्यंत त्यांची मुले त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी आयुष्यात स्थायिक होतील असे गृहित धरणे म्हणजे सर्वसामान्यांसाठी एक नियमच आहे.

करुणा, जगातल्या कोणत्याही व्यावसायिक शहरात राहणारी एक व्यक्ती , जी माझ्यापेक्षा किंवा तुमच्यापेक्षा वेगळी नाही. जीवनात तुमची व्यावसायिक स्थिती कशीही असुदे, आपण सर्वजण एकंदरीत सारखेच जीवन जगत आहोत.
फार फार तर आपल्यापैकी काही जण आपल्या आयुष्यातील काही भाग आपल्या इच्छेनुसार, वर्षातून एकदा घालवण्याचा बहुमान प्राप्त करतात, म्हणजे ते सुट्टी घेऊ शकतात ऐवढ़े भाग्यवान आहेत.

हे ऐकायला, रोजचच वाटत असेल पण सत्यच नसुन ते आपल्या जीवनातलं कटू सत्य आहे. आपल्या नियमित जीवनशैलीपेक्षा काहीतरी वेगळे केल्यावरच आपल्याला आपल्या इच्छेनुसार जीवन जगत असल्याचा भास होतो !

काही महिन्यांपूर्वी, कोरोना या अज्ञात आपत्तीमुळे आपल्या सर्वांप्रमाणेच करुणा चे सामान्य जीवन ही बदलून गेले.

कदाचित, इतिहासामध्ये प्रथमच अशी घटना घडतेय. जी संपूर्ण जगाला एकाच वेळी एकच अनुभव देत. प्रथमच संपूर्ण मानवजातीला एकत्र सारख्याच समस्येचा सामना करावा लागला आहे. आपण विकसित किंवा विकसनशील या पैकी कुठल्या प्रकारात मोडणार राष्ट्र आहोत,त्याने अणूएवढाही किंवा कोरोनाच्या भाषेत सांगावं तर विषाणु एवढाही फरक पडत नाही.

कोरोना इतर आपत्तींसारखा नाही, हा आपल्या सगळयांचच जीवन बदलू पाहतोय. हा जगातील बहुसंख्य देश कसे जगतात ते एकाच वेळी बदलू शकतो.

हा कोरोना, जर गेला किंवा तो आपल्या आयुष्याचा भाग झाला तरीही आपलं आयुष्यच कायमच बदलून टाकेल, पुढे पाहुया कसं ते.

अन्न: या विषाणूबद्दल आपण सर्वप्रथम ऐकले की याचा प्रसार चीनच्या वुहानमधील मांस बाजारातून झाला आणि प्राण्यांच्या माध्यमातून माणसाला हा संसर्ग झाला. त्यामुळे, खबरदारी म्हणून अनेकांनी मांसाहार खाणे बंद केले आहे.

तसेच, जगभरातील मोठ्या लॉकडाऊनमुळे पुरवठा तर मर्यादित आहेच. त्यामुळे बरेच लोक गेल्या एक-दोन महिन्यांपासून घरगुती शाकाहारी भोजनाकडे वळाले आहेत. सर्वज्ञात आहे की शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने आरोग्य चांगले रहाते आणि रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास देखील मदत होते. हल्ली आपल्यापैकी बर्‍याचजणांनी हे अनुभवलेही आहे. त्यामूळे बहुतांश जनता आता शाकाहारी बनू शकते, म्हणजेच बरेच प्राणी शांतपणे आपले जीवन जगतील, कारण कमी प्राणी मारले जातील, निसर्ग आणखी बहरून येइल.

पण, मांस उद्योगाला मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, शक्यतो भाजीपाल्याच्या पुरवठ्यात मागणी वाढेल आणि कदाचित शेवटी शेतकरी समुदायचा त्रास थांबेल. अनेकांना फायदेशीररित्या शेती उद्योगांकडे वळण्याची देखील ही संधी असेल. काही प्रमाणात, खाण्याच्या सवयीतील बदल आपल्याला एक स्वस्थ आणि निरोगी समाजाकडे घेऊन जाईल.

स्वच्छता : जगात अद्याप कोरोनाची लस नाही आणि हा विषाणू पृष्ठभागावर राहून पसरतो, त्यामुळेच WHO ने दिलेली सर्वात पहिली सुरक्षितेची सुचना स्वच्छता राखण्याची होती. जगभरात आपल्यापैकी बर्‍याच जणांनी आपल्या स्वच्छतेच्या पातळीच्या एक पाऊल पुढे नक्किच टाकले आहे. हे जवळजवळ सर्व व्यवसायांमध्ये तसेच प्रत्येक संभाव्य मानवी संपर्कात दिसून येतेय.

कोरोना नक्कीच आपली स्वच्छता जागरूक करीत आहे, जो पुन्हा एक चांगलाच बदल आहे. यामुळे साफसफाईची उत्पादने आणि सेवांची मागणी वाढेल आणि त्यामुळेच बर्‍याच जणांना संधी देखील मिळेल.
मागणीनुसार, स्वच्छता समाजातील प्रत्येक कानाकोपरयात दिसून येइल, नकळत का होइना आपण निश्चितच सुधारणेच्या दिशेने वाटचाल करत आहोत.

वातावरणः रस्त्यावर कमी वाहनांचा संचार आणि त्याचा परिणाम आपण सर्वानीच पाहिला आहे, आपले वातावरण दिवसेंदिवस चांगले होत आहे. या कारणासाठी काम करणारे बरेच मोठे प्रकल्प तितके प्रभावी नव्हते, जितका लॉकडाऊन एक भक्कम तोडगा असल्याचे सिद्ध होत आहे.

आपण भारतीय उपास केल्याने मिळणारे फायदे पुर्वीपासुनच जाणतो. नियमित उपवास ज्या प्रकारे आपल्या शरीरास स्वत: ची चिकित्सा करण्यात मदत करतो आणि आपले आरोग्य चांगले राहते, तसेच भविष्यात नियमितपणे छोटे छोटे लॉकडाऊन पाळल्यास म्हणजेच सामाजिक वावराचा उपास पाळल्यास, वातावरणास स्व-उपचार करण्याची संधी मिळेल आणि पृथ्वीची जगण्यासाठी सध्या माहित असलेला एकच ग्रह ही गुणवत्ता आणि ओळख राखण्यास मदत होईल. दरमहा केवळ 1 शनिवार व रविवारसाठी आपण स्वत:च जर स्वखुशीने लॉकडाउन पाळले तर उर्वरित महिन्यात श्वास घेण्यासाठी आपल्यालाच शुध्द हवा मिळेल आणि भविष्यातील पिढ्यांना एक जिवंत वातावरण मिळेल.

तसाही, बर्‍याच काळापासून एक प्रश्न आपल्यातील अनेकांना त्रास देत होता, आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी कोणत्या प्रकारचे वातावरण सोडुन जाणार? हे त्यातच उत्तर असू शकते.

महिन्यात फक्त एका आठवड्याचे शेवटचे दोन दिवस जर हा अनोखा उपवास आपण पाळला तर वर्षाला 24 दिवस म्हणजेच जवळ जवळ एका महीन्याचे प्रदूषण आपण कमी करु, दरवर्षी एका महीन्याची इंधनाची मागणी काही प्रमाणात कमी करणे, नक्किच इंधनाच्या किमतीत म्हणजे petrol च्या भावात फरक आणेल आणि त्याचा हळुहळु आपल्या सर्वच खर्चांवर परिणाम होऊ शकेल आणि हे जवळजवळ सर्वच उद्योगांसाठी लाभदायी ठरेल.

काम करण्याची पद्धत : आता प्रवासावर निर्बंध असल्याने, कोणताही पर्याय शिल्लक नाही, म्हणून बर्‍याच कंपन्यांनी ‘ work from home‘ म्हणजेच घरुनच काम करायला सुरवात केली आहे.
कदाचित आपल्यापैकी बर्‍याचजणांना नेहमीच घरातूनच काम करायचे होते. परंतु, सध्या ज्या प्रकारे तुलनेने मागणी कमी असताना कामाचा त्रास अचानक खूपच वाढला आहे. परंतु लवकरच, आपण व्यवस्थित घरुन काम करायला शिकू आणि हे सर्व भरपुर फायदेशीर ठरेल.

कंपन्यांना कळून चुकले आहे की बर्‍याच कामांसाठी घरातून काम करणे शक्य आहे आणि कंपन्यांना हेही समजले आहे की यामुळे कार्यालयासारख्या म्हणजेच office या पुर्वीच्या पायाभूत सुविधेमध्ये गुंतवणूकीची आवश्यकताच नाहिये आणि बर्‍याच कंपन्या सध्याच्या पायाभूत सुविधांच वापरून त्यांचे व्यवसाय वाढवू शकतील.
कोरोनापूर्वी देखील को-वर्किंग स्पेसेस (co-working space) कार्यालये चालवण्याच्या पद्धतीत बदल करत होतीच आणि आपल्या सर्वांनाही माहित आहे की विचारात थोडासा बदल केला तर आयुष्यातही बरेच छान बदल घडू शकतात.
घरातून काम शकल्यामुळे, कर्मचारी त्यांच्या ऑफिसच्या आवारापासुन दूर राहू शकतात, जे सर्वसाधारणपणे शहरातील जास्त किंमतीच्या घरांसाठी म्हणजेच real estate साठी ओळखले जातात. त्याने शहरापासुन दुर च्या भागात किंवा कदाचित गावखेड्यात इंटरनेट सेवांची आवश्यकता वाढेल कारण आता केवळ प्रतिभेच्या जोरावर तुम्हाला google सारख्या कंपनीतसुद्धा व्हिसा शिवाय जगाच्या कूठल्याही गावातून काम करता येइल.

Google आणि facebook ने नुकतेच जाहीर केले आहे की त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांना 2021 पर्यंत कार्यालयात येण्याची गरज नाही !. रिअल इस्टेटच्या किंमतीवरही या बदलाचा परिणाम होईल आणि कदाचित सगळयांनाच घर घेणे शक्य होइल!

अश्याप्रकारे अन्न, स्वच्छता, पर्यावरण आणि कार्य संस्कृतीत बदल होऊ शकेल, आणि करुणाच्या जीवनावरही त्याचा निश्चितच मोठा परिणाम होईल.

रोज प्रवासात घालवलेले किंवा खरतर मुलांच्या चिंतेत घालवलेले तास तिला मुलांसोबत घालविण्यासाठी उपलब्ध असतील आणि आनंदी करुणा नक्किच तिच्या कामातही जास्त छान कामगिरी करेल.

नक्कीच एक नवीन भविष्य आपल्या सर्वांच्याच प्रतीक्षेत आहे. फक्त जर आज, आपण आत्तासाठी जे महत्त्वाचे आहे ते केले तर हे भविष्य उद्या आपल्या जीवनात काही महत्त्वाचे बदल घेउन येइल.

कोरोना लवकरच जाईल आणि करुणाही पुन्हा आनंदी होईल!

कदाचित, यावेळी पुर्वीपेक्षा जास्त!

तोपर्यंत, घरी रहा आणि सुरक्षित रहा.

~ Cozebuzz

One Comment Add yours

  1. Rakhee says:

    Sundar lihilay….
    Ekhadya sundar swapna sarkh…..
    Karan… kharach lok aata tari sudhartil ka ha prashnch aahe…..

Leave a Reply

Your email address will not be published.