उघड्या डोळ्यांची स्वप्ने.

स्वप्न ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातील, श्वासांनंतर एकमेव अशी गोष्ट आहे, जी आपल्याला जिवंत ठेवते व एकाच धाग्यात बांधते.

आपण कोण आहात, आपले वंशज कुठले किंवा आपण दयाळू व्यक्ती आहात किंवा नाही त्याने काहिच फरक पडत नाही, स्वप्ने नेहमीच आपला भाग असतात. फक्त काही जिवंत तर काही तुटलेली असतात.

काही स्वप्ने ही आपल्या पाचवीलाच पुजलेली असतात. एक स्वप्न जे आपले आई बाप आपल्यासाठी बघतात, एक जे समाज नकळत बघायला लावते आणि एक जे कुठेतरी आत आपण लपवून जगत रहातो.

तरीसुद्धा, आपल्यापैकी बरेच जण हेच विसरतात की तेसुद्धा स्वप्न पाहण्यास पात्र आहेत आणि मग ते दुसर्‍या एखाद्याच्या स्वप्नांची पात्र बनतात.

खरतर, स्वप्नांच्या जगात काहीच मर्यादा नसतात. कोणाचीही परवानगी घेतल्याशिवाय आपण कशीही आणि कितीही स्वप्न पाहू शकतो.

नक्कीच काहितरी कारण असेल की ज्यामुळे, मानव हा एकमेव सजीव प्राणी आहे ज्याला मुक्त डोळ्यांनी स्वप्न पाहण्याची मोकळीक आहे.

कुठेतरी, मानवी उत्क्रांती अनेक लहान स्वप्नांचा परिणाम असावी.
आज ही ज्या गोष्टी मानवी यशाची कहाणी सांगतात, त्या कधीतरी कुणाच्या तरी स्वप्नांचा एक भाग होती.

हा ब्लॉग, ज्या मोबाईल किंवा संगणकावरून हा ब्लॉग वाचत आहात ते, नील आर्मस्ट्राँगचं चंद्रावरच पहिलं पाऊल किंवा अणुशक्ती बॉम्ब, जी गोष्ट आज तुम्ही पाहू शकता, वापरु शकता किंवा नष्ट करू शकता ती प्रत्येक गोष्ट कधीतरी एखादयाच्या स्वप्नांचा एक भाग होती.

जर आपण हे समजू शकलात की ज्या खुर्चीवर आपण आत्ता बसलात तो एके काळी एक अविष्कार होता जो कुणाच्यातरी स्वप्नातून साकार झाला होता, तर तुम्हाला हे समजेल की प्रत्यक्षात आपण बर्‍याच लहान स्वप्नांनी वेढलेलो आहोत किंवा मी अस ही म्हणू शकतो की आपली वास्तविकता अनेक छोट्या छोट्या स्वप्नांचा परिणाम आहे. उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने.

बर्‍याच वेळा, जबाबदारीमुळे किंवा यशस्वी होण्याच्या नादात, आम्ही अनेक मुखवटे घालतो आणि स्वतःचे खरे रूप लपवतो, जेणेकरुन लोक आपल्या पसंत करतील, आपल्याला स्वीकारतील आणि आपण अडचणीत येणार नाही आणि मग शेवटी कधीतरी आपण आपली स्वतःची स्वप्ने विसरून जातो.

आपण अत्यंत यशस्वी होण्याचा मुखवटा घालतो पण आपण खरच सुखी आहोत का?

आज आपल्या समाजाने व्यावसायिक दृष्टिकोनातून आपली स्वप्ने पाहण्याची दृष्टीच निकामी केली आहे आणि म्हणूनच आपली स्वप्ने मर्यादित राहिली, एवढच न्हवे तर तणावाचा भाग बनत आहेत.

आपल्यापैकी बहुतेक लोकांकडे एकसारखीच स्वप्ने असतात जी बहुतेक आपल्याला समाजाद्वारेच दाखवली जातात. जसे घर, कार, नवीन मोबाईल किंवा ब्रँडेड शॉपिंग खरेदी करणे आणि एका खोलीतील सर्वच जेव्हा डब्यातल्या शेवटच्या लाडूसाठी लढु लागतील तेव्हा तणाव हा निश्चीतच आहे.

खरं तर, एकटं असतानासुद्धा हे मुखवटे ओळखणे कठीण आहे, ही सवय खुप जुनी आहे. पण मग मुखवटा ओळखायचा तरी कसा ?

आपल्यापैकी बरेचजण हा मुखवटा अगदी लहान असल्यापासून घालत आहेत.

आज स्वत:च्या काही निर्णयाबद्दल स्वत:ला जाब विचारा, कधी कधी काही प्रसंग तुम्हाला इतकं अस्वस्थ का करतात, काही जन तुम्हाला अजिबात आवडत नसले तरी तुमचे मित्र का असतात. आयुष्यातल्या प्रत्येक मुखवट्या मागे काहितरी कारण नक्कीच असतात.

कदाचित, हा लॉकडाउन म्हणजे आपल्या अंतर्मनात जाऊन आपला हेतू आणि कृत्य यांचा सखोल अभ्यास करण्याची योग्य वेळ आहे.

आपल्या मूल्यांसाठी, आपल्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहीलेल्या स्वप्नांसाठी जगण्याची वेळ आली आहे!

जर हा ब्लॉग वाचताना, आपल्या काही विसरलेल्या स्वप्नांशी पुन्हा नाती जुळवू शकला असाल, तर कमीतकमी एखाद्या स्वप्नाविषयी तरी आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.

आज आपण स्वत: ला आठवण करून देऊया की केवळ माणुसच मुक्त डोळ्यांनी स्वप्ने पाहू शकतो आणि आपली स्वप्नेसुद्धा प्रत्यक्षात येऊ शकतात.


~ Cozebuzz

9 Comments Add yours

 1. Yogesh says:

  Khup Chan aahe

  1. DARSHAN ANGRE says:

   That’s very true things and our real life experience also..

  2. Rakhee says:

   Yes… It’s true…. Dusryanchi swapn purn karnyachya nadat aapan aapli swapn ch visrun jaato… Aani jevha athavtat tevha vel nighun geleli aste..?

 2. Kirti says:

  Very nice article 👌

 3. Bhakti B. says:

  Actually tuza he sentence ” प्रत्यक्षात आपण बर्‍याच लहान स्वप्नांनी वेढलेलो आहोत किंवा मी अस ही म्हणू शकतो की आपली वास्तविकता अनेक छोट्या छोट्या स्वप्नांचा परिणाम आहे. ” is the zest of the real life…. It’s really an impactful statement which can definitely made anyone to live their dreams,,, at least now it’s impacted me…. 👍,,not for my old dreams but , to have some new ones 😊

 4. Shubhad says:

  कदाचित, हा लॉकडाउन म्हणजे आपल्या अंतर्मनात जाऊन आपला हेतू आणि कृत्य यांचा सखोल अभ्यास करण्याची योग्य वेळ आहे…माझ्या मनातले बोललास.आणि जर आपण हे आत्ता नाही करू शकलो तर कधीच नाही करू शकणार.विश्व सारखं सारखं थांबतं नसतं.

 5. Wilma says:

  Hi, constantly i used to check blog posts here in the early hours in the morning, since i like to learn more and more.

 6. Michele says:

  Currently it sounds like Expression Engine is the top blogging platform out there right now.
  (from what I’ve read) Is that what you’re using on your blog?

 7. Ferdinand says:

  Superb site you have here but I was curious if you knew
  of any message boards that cover the same topics talked about here?
  I’d really like to be a part of group where I can get feed-back from other experienced individuals that share the same interest.

  If you have any suggestions, please let me know. Many thanks!

Leave a Reply

Your email address will not be published.