कधी कधी अस वाटत की, मातृदिन म्हणजे mother’s day हा साजराच का करावा?
असा ठरवून साजरा केलेला दिवस खरं तर आपल्याला “मातृत्व साजरं करायचं किंवा नाही असा एक प्रकारे पर्यायच देतो”. बाकीच्या कुठल्याही एखादया भावनेला किंवा कारणाला समर्पित केलेलया दिवसांसारखं, आईचं प्रेम एखादया दिवशीच साजरं करावं का?
आईचं प्रेम, ही तर खरी प्रत्येक दिवशी साजरी करावी अशी भावना आहे. दररोज आदर करावा आणि आयुष्यभर हृदयात ठेवावे असं असते आईचं प्रेम.

खरं तर आई होणे आणि त्याग करणे ह्यात फारस अंतर नाही आणि हे समजवूनही सांगण्याची काहीच गरज नाही, मुलाच्या जीवनात आईची भूमिका किती महत्वाची आहे हे सर्वांनाच माहित आहे.
आई, या विषयावर मी अजुन काय बोलणार खरं तर, जे संतानी सांगीतलेय किंवा गायलेय त्यापेक्षा जास्त, आता काय लिहाव मी.
खरयं मी नविन काहिच लिहू शकत नाही, पण आज मला काहितरी काढून घ्यायचेय.
सगळयांचीच एक आई असते, म्हणजे आई असल्याशिवाय आपलं अस्तित्त्वच शक्य नाही.
मी एक महिला नाही, म्हणून मला आई होणे काय असते, हे कधीच कळणार नाही. मातृत्व ही खर तर देवाने स्त्री ला दिलेली एक उच्च पदवी आहे, जी पुरुषाला कीतीही कर्तुत्व दाखवले तरी अनुभवणे शक्य नाही.
मला माहित आहे की आई होण्याची प्रक्रिया फारच कठिण आहे. परंतु कदाचित ती तितकीच चमत्कारीक आणि आनंदमयसुद्धा असावी, एक जीव तुमच्या आत जन्म घेतो आणि हळुहळु वाढत जातो, तुम्ही जे खाता ते त्या जिवासाठीच असत , म्हणजे तुमची प्रत्येक गोष्टच जणू फक्त त्या ईवल्याश्या जीवासाठीच असते, आणि प्रत्येक श्वास जणू तुम्हाला आठवण करून देत असावा की तुमच्यात एक जीवन अस्तित्त्वात आहे.
स्वतःवर प्रेम करायला वेळ मिळावा म्हणून कदाचीत निसर्गाने स्त्रियांना दिलेला हा एक विश्राम असावा. पण बघता बघता मुल पूर्णत्वाला येत आणि रडत रडत आयुष्याला सुरवात करत.

एकदा, स्वर्गीय डॉ. ए.पी.जे. कलाम यांनी अतिशय सुंदरपणे म्हटले होते की “तुमचा जन्म झाला तो दिवस फक्त एकच असा दिवस होता, जेव्हा तुम्ही रडला होतात आणि तुमची आई हसली होती”
हे रडणे खरं तर एका मोठ्या प्रवासाची केवळ सुरुवात असते. आईसमोर आपण आयुष्यभरच रडतो. कारण, आपल्याला ठाऊक असते, की ही जगातील एकमेव अशी व्यक्ती आहे जी कधीच आपलयाला चुकिच नाही समजणार .
पण कदाचित, आपली आई कधीच चुक न करण्याच्या ओझ्याखाली तर जगत नसावी. कधीही चुक न करणे किंवा परिपूर्ण आई होणे, याच ओझं तर नसेल तिच्यावर?
आपल्या सर्वांच्या मनात एक आदर्श आईची परिपूर्ण कल्पना असते, जी आई मागच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करते.

लेखक, कवी आणि चित्रपट निर्मात्यांना या बाबत धन्यवाद म्हणावे लागेल, त्यांनी नेहमी एक परिपूर्ण आईच चित्रीत केली आहे, पण कधी आईच्या मागची एक सामान्य स्त्री नाही दाखवली त्यांनी !
एक साधी स्त्री, जी चुका करु शकते आणि जी त्या कथा कादंबरयातल्या, कहाणीतल्या आईपेक्षा वेगळी असू शकते. कदाचित जीची स्वतःची एक कहाणी असू शकते? काही स्वप्ने असावित तिची किं तुमच्या जन्मानंतर तिने स्वप्ने पहाणेच बंद केले ?
ह्या Mother’s day ला तिच्याकडून हे परिपूर्णतेच ओझ् काढूण घेऊया का ? तिला सांगूया का की तुही कधी कधी चुक केलीस तर अगदी चुकिची ठरत नाहीस, आणि आपण सगळेच चुका करतो म्हणुन.
आईमधल्या, तुमच्या जन्मापुर्वीच्या त्या मुलीला भेटायचा एक प्रयत्न तर करा !

हा आईचा दिवस असला तरी यंदा त्या मुलीला भेटायचा प्रयत्न करा, जिने तुम्ही हसावं म्हणून तिच्या आयुष्यातल सर्व काही बदललं .
~ Cozebuzz
Sundar….
Ho … Ek divas tari tine Aai panach oaz kadhun mukt pane jagala pahije…
👌👌👌
Good Blog